Blog

  • Home
  • entrepreneurship
  • उद्योजकता विकासाची गरज – काळाची गरज...

उद्योजकता विकासाची गरज – काळाची गरज...

उद्योजकता विकासाची गरज – काळाची गरज...

ती कशी करता येईल आणि त्याचा होणारा व्यक्तीगत फायदा

उद्योजकीय गुणवत्ता आणि उद्योगाची निवड - एक विद्यार्थ्याचा फोन आला की करियर निवडण्यासाठी सल्ला हवा आहे, ह्या वर्षी बारावी पूर्ण होणार आहे, बारावी नंतर काय  करायचे हा निर्णय घ्यायचा आहे – त्याला M.B.A. किंवा कायद्याचा अभ्यास किंवा इवेंट पदविका करायची होती. हे तीन पर्याय निवडायचे होते. (ह्या परिस्थितीमधून बरेच उद्योजक जातात, ज्यांना व्यवसाय चालू करायचा असतो) मी त्याला विचारले पदविका घेतल्यावर व्यवसाय करायचा आहे की नोकरी करायची आहे? मला व्यवसाय करायचा  आहे ह्या निर्णयावर तो ठाम होता. मी त्याला सांगितले जर उद्योग करायचा असेल तर प्राथमिकता: ह्या तिन्ही पर्यायांचा विचार नंतर येतो प्रथम तुला उद्योजकता  म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. जर तुला उद्योजकता हा विषय कळला  तर नंतर ह्या तीन पैकी एक विषयाची निवड तुझ्या उद्योजकीय गुणवत्तेप्रमाणे करता येईल.

त्यासाठी प्रथम उद्योग जगत म्हणजे काय आहे आणि उद्योग जगतामधील मूळ आव्हान काय आहे ते समजून घेवूया.

 

 

उद्योग जगतातील मुळ  आव्हान -

जगातील (भारतातील नव्हे) उद्योजकीय यश आणि अपयशाचे सर्वेक्षण जर आपण बघितले तर उद्योजकीय यशापेक्षा अपयशाचे प्रमाण जास्त दिसून येते.

ह्याची कारणमीमांसा तज्ञ बरेच वेगवेगळ्या प्रकारे करतात.

जर शांतपणे विचार केला तर ह्याच मूळ कारण आहे कि प्रत्येक उद्योजक एक पदवी/डिप्लोमा/प्रमाणपत्र/एखादे व्यावसायिक कौशल्य शिकून उद्योग करायला उतरतो. उद्योग करायची कारणे वेगवेगळी असू शकतात उदा. उद्योजक बनण्याची आवड,  भरपूर पैसा कमवायच आहे, स्वातंत्र्य, परंपरागत उद्योग, एखाद्या कौशल्यात पारंगत असणे, शिक्षण नसल्यामुळे नाईलाजास्तव किंवा नोकरी गेल्यामुळे वगैरे.  परंतु वरील प्रमाणपत्रा किंवा कौशल्याशिवाय उद्योग सुरु कसा करायचा, उद्योग चालवायचा कसा, उद्योग टिकवायचा कसा आणि उद्योग विस्तार कसा करायचा ह्याचे प्रशिक्षण कुठलीच शैक्षणिक संस्था सूक्ष्म/लघु/मध्यम  उद्योजकांना देत नाही.

प्रत्येक उद्योजक ह्या संदर्भातील माहिती घ्यायची वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असतो उदा. पुस्तके, उद्योजकीय कार्यशाळा/चर्चासत्रे, उद्योजकीय सल्लागारांची मदत वगैरे. परंतु फारच कमी प्रमाणात उद्योजक उद्योग विस्तार करताना दिसतात आणि मोठ्या प्रमाणात उद्योजक एका चक्रव्युव्हामध्ये अडकलेले असतात.

ह्याचाच अर्थ उद्योजकता विकास ह्या संदर्भात फार कमी प्रमाणात मार्ग उपलब्ध आहेत.

त्यामुळे उद्योजकीय विकास हि आता प्राथमिक गरज बनलेली आहे.

 

उद्योगाची निवड -

उद्योगाची निवड कशी  करायची आणि उद्योजकीय विकास म्हणजे काय हे आपण स्पोर्ट्सचे  उदाहरण घेऊन बघूया. स्पोर्ट्समध्ये प्रत्येक खेळ शिकायचे आणि खेळ खेळायचे नियम ठरलेले असतात. एका खेळाचे नियम दुसऱ्या खेळाला लागू पडत नाहीत. उदा. फुटबाँल मध्ये चेंडू पायानेच मारावा लागतो, बास्केटबॉल मध्ये चेंडू हातानेच खेळावा लागतो वगैरे,  असे प्रत्येक खेळ शिकायचे आणि खेळायचे नियम तयार असतात.

एखाद्या मुलाला क्रिकेट मध्ये  जर करिअर करायचे असेल तर त्याला क्रिकेटच्या करिअरची  पूर्णपणे  माहिती असते कि  त्याला काय आवडते त्याप्रमाणे तो फलंदाज होणार, गोलंदाज होणार, यष्टीरक्षक होणार कि अष्टपैलू होणार ह्याचे प्राथमिक ठोकताळे त्याला माहिती असतात. त्याप्रमाणे  कोणाकडून क्रिकेट शिकायचे, त्याचे पैसे किती लागणार, क्रिकेटचे किट कुठले लागणार, प्रथम कुठल्या स्पर्धेमध्य खेळायचे, खेळपट्टीचा अभ्यास, प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास, परदेशातील प्रेक्षक आणि हवामानाचा अभ्यास, ह्याचे त्याला २४/७ सातत्याने मार्गदर्शन होत असते. क्रिकेटमध्ये करिअर कुठपर्यंत जाऊ शकते आणि करियर मध्ये किती पैसे मिळणार ह्याची त्याला पूर्ण कल्पना असते. त्याच्या यशामध्ये त्याच्या सभोवताली व्यावसायिक तज्ज्ञ सल्लागारांची टीम तयार असते. उदा. फलंदाचीच कोच, क्षेत्ररक्षणाचा कोच, फिजिओथेरपिस्ट, आहारतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ वगैरे, शिवाय त्याचे ब्रँड म्हणून प्रमोशन करणारे वेगळे व्यावसायिक सल्लागार उपलब्ध असतात. त्याच्या अपयशामध्ये त्याला सातत्याने वरिष्ठ क्रिकेटरचे मार्गदर्शन मिळत असते. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावरसुद्धा उत्पन्नाचे भरपूर मार्ग त्याला उपलब्ध असतात.

वरील उदाहरणाचा संदर्भ उद्योग जगताशी कसा लावत येईल हे आपण खालील तक्ता अभ्यासून करूया. एखाद्या पाककला निपुण व्यक्तीला समजा हॉटेलचा व्यवसाय करायचं असेल तर नेमके त्याच्या बाबतीत के घडते हे बघूया.

 

क्रिकेट

उद्योग जगत (हॉटेल व्यवसाय )

निवड

आवड असते.

आवड असते किंवा मी पदविका घेतो किंवा नाईलाजास्तव

व्यावसायिक कामाची स्पष्टता

फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक, अष्टपैलू असे चारच प्रकारची वर्गवारी असते  वगैरे.

कुक/शेफ व्हायचे, कुकरी शो करायचे, हॉटेल उघडायचे, ऑनलाइन अन्न विकायचे, फ्रेंचायसी विकणे हयापैकी काय निवडायचे ह्याची पद्धत माहीत नसते.

(एकंदर असे आठ प्रकारचे विभाग असतात)

कौशल्य धोरणांचा अभ्यास/सराव

जर स्पर्धात्मक जगात टिकायचे असेल तर सातत्याने फलंदाजी/गोलंदाजीचा अभ्यास/सराव करावा लागतो ह्याची जाणीव असते.

व्यावसायिक गुणवत्तेप्रमाणे व्यवसाय विकासा संदर्भात नेमका कुठला अभ्यास करायचा हेच माहीत नसते. मी सर्वोत्कृष्ट  कुक आहे ह्या स्वप्नरंजनात हे अडकलेले असतात.

उत्पन्नाचे साधन

फलंदाजीमध्ये बॅट, गोलंदाजीमध्ये चेंडू ही साधन आहे ह्याची जाणीव असते. ह्या साधनाचा वापर करून उत्कृष्ट फलंदाज किंवा गोलंदाज बनणे ह्यावर भर दिल जातो.

पाककला (साधन) नव्हे तर पाककलेचा व्यवसाय हे उत्पन्नाचे साधन आहे ही लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे उत्कृष्ट व्यावसायिक बनणे ही गोष्ट लक्षात घेतली जात नाही. ग्राहक हॉटेल निवडताना उत्कृष्ट सर्वांगीण सेवेची निवड करतो. (जगातील सर्वच शेफ मी उत्कृष्ट जेवण बनवतो असा दावा करतात.)

उद्योजकीय मानसिकता

निव्वळ उत्कृष्ट फलंदाजी किंवा गोलंदाजी नव्हे तर क्रिकेटला व्यावसायिक रूपात बघितल्यावरच पैसा, प्रसिध्द्धी, यश मिळेल ह्याची जाणीव असते.  

निव्वळ उत्कृष्ट शेफ बनण्यावर  भर दिल जातो. पाकाकलेशिवाय उत्कृष्ट हॉटेल व्यावसायिक बनणे ही गोष्ट लक्षात घेतली जात नाही.

कमाल उत्पन्नाची कल्पना

खेळत असताना आणि निवृत्त झाल्यावर मला काय कमाल उत्पन्न मिळणार ह्याची स्पष्टता असते.

वरील आठ प्रकार असतात हेच माहीत नसते, आणि त्याप्रकारे काय कमाल उत्पन्न मिळणार ह्याची स्पष्टता नसते.

तज्ञ सल्लागारांकडून प्राथमिक प्रशिक्षण

मार्गदर्शक कोच/सल्लागार उपलब्ध असतात. क्रिकेट करीयरच्या शेवटपर्यंत यश आणि अपायशमध्ये कोच, सल्लागारांची मदत मिळत असते.

फक्त जेवण कसे बनवायचे हे  शिकवले जाते. व्यवसाय चालू कसा  करायचं, व्यवसाय चालवायचा कसा, व्यवसाय टिकवायचे कसा, व्यवसाय विस्तार कसा करायचं ह्या संदर्भात मार्गदर्शक सल्लागारांची कमतरता.

अपयशामध्ये ही व्यावसायिक एकटे पडतात.

करियर मध्ये स्थिर होण्याचा कालावधी

जास्तीत जास्त दहा वर्षात इथे स्थिर होता येते.

उद्योजकीय गुणवत्तेप्रमाणे विकासावर भर न दिल्यामुळे व्यवसायात स्थिर होता येत नाही.

इतर घटकांची माहिती.

फलंदाजी, गोलंदाजीशिवाय खेळपट्टि, स्पर्धक, परदेशातील प्रेक्षकांची मानसिकता ह्याची माहिती असते. 

पाककलेशिवाय व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेली वस्तु/सेवा निर्माण किंवा नवनिर्माण किंवा सुधारणा कशी करायची, ग्राहकाची मानसिकता, मार्केटिंग, सेलिंग, कर्मचाऱ्यांची मानसिकता, टेक्नॉलॉजीचा वापर वगैरे गोष्टींची फार कमी प्रमाणात जाणीव असते. 

व्यावसायिक वातावरण

क्रिकेटमधील सर्वोत्तम आजी/माजी खेळाडूंबरोबर वावर असतो.

उद्योग जगतामध्ये असे वातावरण फार कमी बघायला मिळते. जरी असले तरी    आत्मविश्वासाच्या अभावामुळे अश्या वातावरणात मिसळायला लाज वाटते. 

 

हॉटेल व्यवसायाचे उदाहरण घेवून वरील तक्ता बनविला आहे. हा तक्ता कुठल्याही सूक्ष्म/लघु/मध्यम उद्योजकासाठी इतर इंडस्ट्रीसाठीपण लागू पडतो.

उद्योजकता विकास म्हणजे नेमके काय?

ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते कुठलाही व्यवसाय हा कुठलीही (पाककलेची) पदविका/प्रमाणपत्र किंवा व्यावसायिक कौशल्य शिकून सुरू होत  नसतो. ते निव्वळ व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे साधन आहे. हे साधन म्हणजे व्यवसाय नव्हे. व्यवसाय सुरू करने, व्यवसाय चालविणे, व्यवसाय टिकवणे व्यवसाय विस्तार करने ह्या संदर्भातील कौशल्ये आणि धोरणे पुर्णतः वेगळी असतात. जी फार क्वचितच शिकवली जातात. व्यवसाय टिकवणे आणि व्यवसाय विस्तारासाठी खालील गोष्टी शिकणे अनिवार्य असते.

व्यवसायाचा विस्तार एकंदरीत सहा टप्प्यामध्ये होतो.

त्यातील प्रमुख घटक पुढील प्रमाणे आहेत. १ प्रथमत: उद्योजकीय गुणवत्ता ओळखणे, 2. उद्योजकीय गुणवत्ता आणि व्यावसायिक पदविकेचा मेळ घालून व्यवसाय निवडणे, 3. वस्तु/सेवा निर्माण करने आणि त्याची व्यवहार्यता तपासणे, ४. वस्तु/सेवेमध्ये नावीन्य आणणे, ५. ग्राहकाची वर्गवारी ओळखणे, ६. ग्राहकाची वस्तु/सेवा खरेदीची मानसिकता ओळखणे, ७. मार्केटिंगची साधने, धोरणे आणि कौशल्ये निवडणे, ८. विक्रीची साधने, धोरणे आणि कौशल्ये निवडणे, ९. कर्मचारी/भागीदारची गुणवत्ता ओळखणे, १०. कर्मचाऱ्याच्या गुणवत्तेप्रमाणे विकास करने, ११. व्यवसायाची प्रणाली बनविणे, ज्यामुळे तुमचा  व्यवसाय तुम्हाला नफा/तोटा  देतो ह्याचे गणित कळेल, १२. व्यवसायाचा ब्रॅंड करने, १३, व्यवसाय विस्तार करने वगैर.

गुणवत्ता म्हणजे काय ?

गुणवत्ता म्हणजे आपल्या पंचेंद्रियांपैकी एका  इंद्रियचा वापर करून, आपण ज्या साधनाची (फलंदाजी, गोलंदाजी) निवड केलेली आहे, त्याचा सातत्याने सराव करून त्यात प्राविण्य मिळवणे. उदा. चित्रकार दृष्टी ह्या इंद्रियाचा वापर करून चित्रकार म्हणून प्राविण्य मिळवतो, संगीतकार/गायक श्रवणेंद्रीयाचा वापर करून संगीत क्षेत्रात प्राविण्य मिळवतात, शेफ रसणेंद्रीयाचा वापर करून पाककला क्षेत्रात प्राविण्य मिळवतात, वैद्य स्पर्शज्ञान कौशल्याचा वापर करून निदान करण्यात वैद्यकीय क्षेत्रात प्राविण्य मिळवतात. तुमच्या लक्षात आलेच असेल की तुमच्याकडे प्रथम पदविका/व्यावसायिक तंत्र येते, नंतर तुमच्या इंद्रियांचा वापर करून त्यात प्राविण्य मिळवता येते.

उद्योजकीय गुणवत्ता म्हणजे काय?

वरील हॉटेलच्या उदहरणामध्ये आपण  कुक/शेफ व्हायचे, कुकरी शो करायचे, हॉटेल उघडायचे, फ्रेंचायसी विकणे    ऑनलाइन अन्न विकायचे वगैरे असे विभाग बघितले. असे आठ विभाग असतात ज्यात तुम्ही हॉटेल व्यवसाय करू शकता. तुमच्या  विकसित झालेल्या इंद्रियाप्रमाणे तुम्ही आठपैकी एक विभाग निवडून त्यात प्राविण्य मिळवू शकता.

वरील स्पोर्टसच्या  उदहरणामध्ये आपण बघितले प्रत्येक खेळ शिकायचे आणि खेळायचे नियम वेगळे असतात, त्याचप्रमाणे एकाच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ह्या आठ गुणवत्तेप्रमाणे उद्योग करायची धोरणे, साधने, कौशल्ये, लागणारे भागीदार, कर्मचारी वेगवेगळे  असतात.

उद्योजकीय गुणवत्ता विकास आणि त्याचे फायदे -

जर तुम्हाला तुमची उद्योजकीय गुणवत्ता कळली आणि त्याप्रमाणे व्यवसायाचे वरील टप्पे आत्मसात करता आले तर सध्याच्या करोंना महामारीचा काळ, राजकीय निर्णयांमुळे व्यवसायावर होणारे बदल, माहिती आणि तंत्रज्ञानामुळे व्यवसायात होणारे बदल, जागतिक आर्थिक पेचप्रसंगामुळे व्यवसायात होणारे बदल ह्या काळामध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय टिकत नाही. ह्या काळामध्ये तुमचा  पैसा, यश, प्रसिध्द्धी तुमच्याकडून निघून जाईल, परंतु तुमची उद्योजकीय गुणवत्ता तुमच्याकडेच असेल. ज्यामुळे तुम्हाला परत गरुड भरारी घेता  येईल.

जगाला सर्वोत्तम द्या, जेणेकरून जगातील सर्वोत्तम तुमच्याकडे परत येईल.

टीप – वरील लेख ढोबळ स्वरुपात मांडला आहे, त्या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर तुमचा प्रश्न nitinsalkar@hotmail.com ह्या इमेल आयडी वर पाठवणे किंवा 9321897941 ह्या मोबाइल वर संम्पर्क करणे.

Nitin Salkar.

Career Intellect Coach.

9321897941.

nitinsalkar@hotmail.com

www.intellipedia.in